Dhangar Samaj Aarakshan Yachika : धनगर समाजाची याचिका हायकोर्टाने फेटाळली; अमळनेरात आदिवासी संघटनांचा जल्लोष

हॅपनिंग महाराष्ट्र

प्रमोद परदेशी | अमळनेर : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) मधून आरक्षण मिळावे, यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्याने लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. (High Court rejects Dhangar Samaj’s Petation; Cheers of tribal organizations in Amalner)

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) मधून आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाजाच्यावतीने मुंबई उच्च न्याालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, ही याचिका शुक्रवारी उच्च न्याालयाकडून फेटाळण्यात आली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अमळनेर येथे लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे पन्नालाल मावळे, जेष्ठ नेते मधुकर चव्हाण, गुलाब बोरसे, नरेश चव्हाण, भुरा पारधी, पिंटू पारधी, गणेश चव्हान, अशोक महाराज, हिम्मत पारधी, संदिप पारधी, अजय भिल, पप्पू पारधी, मच्छिंद्र भिल, सुधाकर पवार, वना पारधी, प्रदिप दाभाडे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत