इंदिराबाई ललवाणी विद्यालयात महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा

शैक्षणिक

जामनेर : येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे उपप्राचार्य प्रा. के एन. मराठे यांच्या हस्ते पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक प्रा. डी.झेड. गायकवाड, प्रा. विजय पाटील, गजानन कचरे, प्रा. सोनूसिंग पाटील, प्रा. जे.आर. पाटील, प्रा. मनीषा घडेकर, प्रा. कोमलसिंग परिहार, प्रा. सतीश क्षीरसागर, प्रा. माधुरी तायडे यांसह विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते.

१५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून का साजरा केला जातो. स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या क्रीडा कारकीर्दविषयीची माहिती क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी. पाटील, क्रीडा शिक्षक गजानन कचरे, प्रा. समीर घोडेस्वार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत