रडार लाईव्ह न्यूज । जळगाव
तुम्ही देखील रोजगाराच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जळगावात जळगाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २७ जुन रोजी जळगावात प्लेसमेंट (Placement) ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या (Placement Melava) अंतर्गत तब्बल १५० पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. नोकरी करू इच्छिणाऱ्या उमदेवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून इच्छूकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
जळगाव शहरातील महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) या ठिकाणी गुरुवार, दि. २७ रोजी सकाळी १०:३० दुपारी २: ३० वाजेदरम्यान हा मेळावा पार पडणार आहे. १० वी, १२ वी., पदवीधर, आय.टी.आय तसेच डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार या मेळाव्यात (Placement Melava) सहभागी होऊ शकतील. www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लॉय करण्यासाठी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग ईन करुन अप्लॉय करावे. तसेच, ज्या उमेदवारांनी नांव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह रोजगार मेळाव्याच्या (Placement Melava) ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे व विभागाच्या www.mahaswayam.gov.in/www.ns.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या ठिकाणी साधा संपर्क
उमेदवारांना काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत सकाळी ०९.४५ ते सांयकाळी ०६.१५ वाजेपर्यंत जळगाव कार्यालय (०२५७-२९५९७९०) शी दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवीकुमार एम. पंतम यांनी केले आहे.