रडार लाईव्ह न्युज । जळगाव
जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. जळगावात देखील विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने देखील योग दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने सर्वानी एकत्र येत योग साधना केली.
योग शिक्षिका सीमा पाटील आणि खेमचंद्र पाटील यांनी सर्वांना योगाचे धडे दिले तसेच योगाचे महत्व पटवून दिले. या उपक्रमात सांस्कृतिक प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष पवन अशोक खंबायत, उपाध्यक्ष संजना तायडे, सुहास शंखपाळ, मालती जुनागडे, अरुण सानप, प्रशांत विसपुते, संकेत वारुळकर, शामकांत चौधरी, रत्नाकर कोळी, जगदीश गंगावणे, शितल तायडे यांसह असंख्य नागरिक सहभागी झाले होते.