Maniyar Biradari

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून ईद साजरी; मनियार बिरादरीचा कौतुकास्पद उपक्रम

सामाजिक

रडार लाईव्ह न्यूज । जळगाव

सोमवार, दि. १७ रोजी देशभरात ईद साजरी करण्यात आली. प्रत्येक जण ईदचा आनंद साजरा करीत असतांना जळगावातील मनियार बिरादरीने मात्र, अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवीत ईद साजरी केली. मनियार बिरादरीने अत्यंत गरीब कुटुंबातील १५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी प्रत्येकी २ हजाराची मदत करत एक आदर्श निर्माण केला आहे.

हजरत इब्राहिम यांच्या वडिलांच्या व हजरत इस्माईल यांच्या मुलाच्या स्वरूपातील बलिदानाचे स्मरण करून भक्ती भावाने स्वार्थ, मस्तर, द्वेष न ठेवता त्यागाची भावना पसरवून व त्यासाठी दाना सारखे पुण्य कार्य करण्याचा एक छोटासा प्रयत्न जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने ईद निमित्त केला. जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने शहरातील शिवाजीनगर, हुडको, गेंदालाल मिल, उस्मानिया पार्क व मोहम्मदिया नगर आदी भागातील अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी, ज्यांना शिकण्याची जिद्द व इच्छा आहे, अशा १५ विद्यार्थ्यांचा ‘एंजल फूड’ च्या माध्यमातून शोध घेऊन त्यांना शैक्षणिक कामासाठी प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

शालेय गरजवंत विद्यार्थ्यांसोबत ईद साजरी करण्याचा आनंद जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख व त्यांचे सहकारी अब्दुल रऊफ, सलीम शेख, रफिक शेख, मुजाहिद खान, सलमान खान, सिद्दिक शेख, दानियल शेख, समीर शेख व कय्युम शेख यांनी घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत