मुक्ताईनगर : मागील चार वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी आदर्श अजिंक्य सेवा फाउंडेशन या संघटनेचा आज वर्धापन (Anniversary) दिवस मुक्ताईनगर येथील कार्यालयात साजरा करण्यात आला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष तथा प्राध्यापक कौस्तुभ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिनाच्या (Anniversary) कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या वर्षभरात विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा ठराव संस्थेचे अध्यक्ष प्रा. कौस्तुभ शिंदे यांनी मांडला. यावेळी प्रा. बी. जे. माळी, प्रा. सैंदाणे, प्रा. डॉ. प्रसन्न देशमुख, प्रा. प्रकाश खिल्लारे, प्रा. डॉ. राजरत्न पोहेकर, प्रा. अमर पाटील, प्रा. धीरज वाघ उपस्थित होते.
आदर्श अजिंक्य सेवा फाउंडेशन ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक सामाजिक संघटना असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्यासाठी सदैव सहकार्य करत असते, असे मनोगत प्रा. कौस्तुभ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.