Accident News

Accident News : ओव्हरटेक करण्याच्या नादात डंपरची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

गुन्हे

चाळीसगाव : शहर प्रतिनिधी

चाळीसगावकडून पाचोराकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने (Dumper) दुचाकीला ओव्हरटेक करताना कट (Accident) मारल्याने दुचाकी घसरून त्यावरील अल्पवयीन युवकाचा जागीच मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याची घटना शनिवार, दि. १५ रोजी घडली आहे. याप्रकरणी डंपर (Dumper) चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून साहिल अफजल काकर (वय – १५, रा. लोहारी ता. पाचोरा), असे या अपघातात मयत झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. (A dumper hit a bike while overtaking; One died on the spot)

पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील अल्तमश अन्सार काकर (वय – २२) हा तरूण गावोगावी जावून भांडे विक्री करण्याचा व्यवसाय करतात. अल्तमश हा शनिवार, दि. १५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील साहिल अफजल काकर याच्या सोबत दुचाकी (क्रमांक – एम.एच. १९. ई.ई. ७२०२) ने चाळीसगावकडून पाचोराकडे येत असतांना वाडळी (ता. चाळीसगाव) गावाजवळ अल्तमश याच्या दुचाकीच्या मागे येणारा डंपर ( क्रमांक – एम.एच.१५. जे.सी ६५७०) ने दुचाकीला ओव्हरटेक करतांना कट (Accident) मारला. यामुळे दुचाकीवरील दोघेजण खाली पडले. यात साहिल काकर याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अल्तमश जखमी झाला.

दरम्यान, याचवेळी समोरून येणारी दुचाकी देखील घसरल्याने (Accident) या दुचाकीवरील पुरूष व महिला देखील जखमी झाले. अपघातानंतर चालकाने वाहनासह (Dumper) पळ काढला. याप्रकरणी अल्तमश काकर याने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात (Chalisgaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. जयेश पवार करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत