Jaipur Express

Jaipur Express Firing : जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ हवालदाराकडून गोळीबार

गुन्हे

आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह तीन प्रवाशांचा मृत्यू ; आरोपी जीआरपीच्या ताब्यात

मुंबई :- जयपूर सुपरफास्ट एक्सस्प्रेस (Jaipur Express) मध्ये रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ (RPF)च्या हवालदाराकडून गोळीबार ( Firing) करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज पहाटे ५.२३ मिनिटाच्या सुमारास वापी आणि मीरा रोड स्टेशनदरम्यान घडली आहे. या घटनेत आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आरोपी आरपीएफच्या हवालदारास जीआरपीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन सिंह हा आरपीएफ हवालदार असून तो जयपूर सुपरफास्ट एक्सस्प्रेसमध्ये एस्कॉर्टिंग ड्युटीवर तैनात होता. सोमवार (दि.३१) रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन सिंह आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. यावेळी चेतन सिंह याला इतरा राग आला की, त्याने प्रवाशांवर बंदूक उगारली. यावेळी याठिकाणी उपस्थित असलेले आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांनी चेतन याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेतन काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याने रागाच्याभरात त्याच्या वरिष्ठांसह प्रवाशांवरही गोळीबार केला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर चेतन याने चैन ओढून गाडी थांबवली व पळून जाण्याचा प्रहय्त्न केला. मात्र, शेजारीच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेतले. चेतन सिंह हा सध्या जीआरपीच्या ताब्यात आहे.

तीन डब्यांमध्ये गोळीबार
जयपूर एक्सप्रेसच्या B5, S6 आणि पँट्री कारमध्ये या तीन डब्यांमध्ये चेतन सिंहने गोळीबार झाला असून चेतनने या प्रवाशांना शोधून गोळ्या झाडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. चेतन सिंह याने केलेल्या गोळीबारात आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपुरावाला, (वय-50, रा. नालासोपारा) अख्तर अब्बास अली (वय-48, रा. शिवडी) या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर संबंधित ट्रेन यार्डमध्ये असून फॉरेन्सिक विभागाचे पथक याठिकाणी दाखल झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत