EPFO

देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी ‘आनंदाची बातमी’; ‘पीएफ’वरील व्याजदरात वाढ

भारत विशेष शासकीय

नवी दिल्ली : देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation) अर्थात ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने अर्थमंत्रालयाकडे पीएफ (भविष्य निर्वाह निधी) च्या व्याजदरात ०.१० टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात पीएफ (Provident Fund) वर ८.२५ व्याज मिळणार आहे. देशभरातील तब्बल ८ कोटी कर्मचाऱ्यांना याच लाभ होणार आहे.

‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) २३५ वी बैठक केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि.१०) रोजी पार पडली. बैठकीत २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शिफारस आता वित्त मंत्रालयाकडे जाईल. मंजुरीनंतर नव्या दरानुसार व्याज सदस्यांच्या खात्यात जमा करण्यात केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. (‘Happy news’ for employees across the country; Increase in interest rate on ‘PF’)

८ कोटी कर्मचाऱ्यांना होणार लाभ
सीबीटीने (CBT) आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी एकूण १३ लाख कोटी रुपयांच्या मूळ रकमेवर १ लाख ७ हजार कोटी रुपयांचे व्याज ८ कोटी ईपीएफ सदस्यांच्या खात्यात जमा करण्याची शिफारस केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत