ॲड. एकनाथ पाटील | धरणगाव तालुका प्रतिनिधी
धरणगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील आनोरे, धानोरे गारखेडे, गंगापुरी, पष्टाणे, सोनवद, पिंप्री शिवारातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे.
सात जून पासुन मृग नक्षत्राचे आगमन होते. त्यामुळे पावसाळयाची सुरूवात या नक्षत्रकाळापासून मानली जाते. मृग नक्षत्र येत्या 20 जूनला संपत असून 21 जूनपासून आद्रा नक्षत्र लागत आहे. तरी देखील दमदार पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे. याऊलट ऐन पावसाळ्यात अंगाची लाही-लाही करणारे ऊन पडत असल्याने विहिरी देखील कोरड्याठाक झालेल्या आहेत.
दरम्यान, पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे पूर्वहंगामी कपाशी लागवड केलेली आहे. परंतु,पाणीपातळी खोल गेल्याने शेतकरी चिंतीत आहे.