Talathi Bharati : एका उमेदवाराला मिळाले चक्क 200 पैकी 214 गुण

महाराष्ट्र

तलाठी भरती (Talathi Bharati) तील घोटाळ्याची SIT चौकशी करा; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई : तलाठी भरतीचा (Talathi Bharati) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर ही भरतीच वादाच्या भवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेत एका उमेदवाराला २०० पैकी चक्क २१४ गुण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निकालाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ‘तलाठी भरती (Talathi Bharati) परीक्षा हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप करून या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी’ अशी मागणी केली आहे.

राज्य शासनाच्यावतीने तलाठी पदाच्या ४ हजार ४६६ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. यासाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान, भूमी अभिलेख कार्यालयाकडून या परीक्षेची गुणवत्ता यादी (Talathi Bharati) ५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. मात्र, आता ही भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तलाठी भरतीत घोटाळा…

ज्या उमेदवाराला वन विभागाच्या परीक्षेत 54 गुण मिळाले त्याच उमेदवाराला 15 दिवसांच्या फरकाने झालेल्या तलाठीच्या परीक्षेत (Talathi Bharati) 200 पैकी चक्क 214 गुण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा निकाल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्पर्धा परिक्षा समन्वय समितीसह राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या निकालावर आक्षेप घेतला आहे. स्पर्धा परिक्षा समन्वय समितीने यात सध्याचा सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे तर श्री. वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या SIT चौकशीची मागणी केली आहे.

काय म्हणाले श्री. वडेट्टीवार…

तलाठी भरती (Talathi Bharati) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत ‘तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. २०० पैकी २१४ गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतेय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलाय, हे आता स्पष्ट होत आहे,’ असे म्हटले आहे.

99% जागा विकल्याचा आरोप

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने देखील तलाठी भरतीवर (Talathi Bharati) काही गंभीर आरोप केले आहेत. समितीने ‘हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षकमध्ये ५४ मार्क आणि तलाठीमध्ये २०० पैकी २१४ मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच, या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी (Talathi Bharati) परीक्षेमध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या, आपल्याला फक्त एमपीएससीच देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससीकडे देणार, इथे सरळसेवामध्ये फक्त घोटाळेच होणार, असा आरोप देखील स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत