Rajya Balnatya Spardha : जळगाव केंद्रावर १५ पासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा

हॅपनिंग

३२ नाट्यांची (Balnatya) रसिकांना मिळणार मेजवानी ; विळखाने होणार शुभारंभ 

जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाने महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेनंतर जळगावकर रसिकांसाठी राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेची मेजवानी आणली आहे. दि.१५ जानेवारीपासून रंगणाऱ्या या बालनाट्य स्पर्धेत तब्बल ३२ नाटकांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती समनव्यक ईश्वर पाटील यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव केंद्रावर आयोजित केली आहे. छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे ही फेरी रंगणार असून विनोद उबाळे लिखित आणि सोनाली वासकर दिग्दर्शीत विळखा या नाटकाने या स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे. स्पर्धेचे (Balnatya Spardha) उद्घाटन १५ जानेवारी रोजी राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्य गीतांजली ठाकरे, भुसावळ येथील ज्येष्ठ रंगकर्मी धर्मराज देवकर, डॉ. मुकुंद करंबळेकर, जामनेर येथील ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत तायडे, शिक्षणाधिकारी विकास पाटील उपस्थित राहणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. (State children’s drama competition will be held at Jalgaon center from 15)

या नाटकांची असेल मेजवानी

पाच दिवस चालणाऱ्या या बालनाट्य स्पर्धेत (Balnatya Spardha) तब्बल ३२ नाटकांची मेजवानी असून दररोज सहा ते सात नाटकांचे सादरीकरण होणार आहे. १९ जानेवारी रोजी पवन इंद्रेकर लिखित आणि पुनम जावरे दिग्दर्शित मरी गई या नाटकाने या स्पर्धेचा समारोप होईल.

दि. १५ रोजी सकाळी १० वा. विनोद उबाळे लिखित आणि सोनाली वासकर दिग्दर्शीत विळखा, ११.१५ वाजता रेखा बारी लिखित व दिग्दर्शीत ज्योतीची सावित्री, दुपारी १२.३० वाजता रत्नाकर रानडे लिखित व योगिता बडगुजर दिग्दर्शित विद्या विनयेन शोभते, दुपारी १.४५ वाजता धनंजय सरदेशपांडे लिखित व अनिरुद्ध किरकिरे दिग्दर्शित गांधी व्हायचंय आम्हाला, दुपारी ३ वाजता हनुमान सुरवसे लिखित व राजेश जाधव दिग्दर्शित झपाटलेली चाळ, दुपारी ४.१५ वाजता विजय तेंडुलकर लिखित व रमेश भोळे दिग्दर्शित चांभार चौकशीचे नाटक.

१६ रोजी सकाळी १० वाजता प्रांजल पंडित लिखित व चंद्रकांत कुमावत दिग्दर्शित फुलपाखरु, सकाळी ११.१५ वाजता प्रांजल पंडित लिखित व प्रदीप भोई दिग्दर्शित राक्षस, दुपारी १२.३० वाजता प्रांजल पंडित लिखित व रोहन चव्हाण दिग्दर्शित कॉपी बहाद्दर, दुपारी १.४५ वाजता प्रांजल पंडित लिखित व दिग्दर्शित परी, दुपारी ३ वाजता सुमित राठोड लिखित व मुकेश राठोड दिग्दर्शित गुंडाळलेली स्वप्न, दुपारी ४.१५ वाजता संतोष शिराळे लिखित व दिग्दर्शित सुपर पॉवर, सायंकाळी ५.३० वाजता प्रांजल पंडित लिखित व रोहित ठाकरे दिग्दर्शित ढगाळ लागली कड.

१७ रोजी सकाळी १० वाजता गणेश मरोड लिखित व गायत्री सनांसे दिग्दर्शित आयडेंटिटी, ११.१५ वाजता अभयसिंह जाधव लिखित व रोहिणी निकुंभ दिग्दर्शित क ला का ना का, दुपारी १२.३० वाजता सुरेश शेलार लिखित व आकाश बाविस्कर दिग्दर्शित अ ते ज्ञ, १.४५ वाजता आसिफ अन्सारी लिखित व वैभव मावळे दिग्दर्शित जय हो फॅन्टसी, ३ वाजता ऋषिकेश तुराई लिखित व विशाल जाधव दिग्दर्शित मॅडम, ४.१५ वाजता गोविंद गोडबोले लिखित व अलका भटकर दिग्दर्शित झेप सायंकाळी ५.३० वाजता अमोल ठाकूर लिखित व राहुल दिव्यवीर दिग्दर्शित बदलू आम्ही गोष्टीला.

१८ रोजी सकाळी १० वाजता धनंजय सरदेशपांडे लिखित व मोहिनी पाटील दिग्दर्शित एलियन्स द ग्रेट, ११.१५ वाजता गणेश सिंग मरोड लिखित व पवन इंद्रेकर दिग्दर्शित शोध अस्तित्वाचा, दुपारी १२.३० वाजता हनुमान सुरवसे लिखित व सुमित पाचपांडे दिग्दर्शित खेळ, दुपारी १.४५ वाजता वैभव मावळे लिखित व उल्हास ठाकरे दिग्दर्शित आई मला छोटीशी बंदूक दे ना, ३ वाजता संजय शिंदे लिखित व अजय पाटील दिग्दर्शित वारी, ४.१५ वाजता हनुमान सुरवसे लिखित व दिग्दर्शित मारुतीची जत्रा.

१९ रोजी सकाळी १० वाजता गणेशसिंग मरोड लिखित व सचिन मांडोळे दिग्दर्शित बेला, ११.१५ वाजता सुजय भालेराव लिखित व मेघा कुलकर्णी दिग्दर्शित विधी, दुपारी १२.३० वाजता पुष्कराज शेळके लिखित व कुंदन तावडे दिग्दर्शित आम्हीही आहोत निराळे, १.४५ वाजता धनंजय सरदेशपांडे लिखित व स्वप्निल काळे दिग्दर्शित आदींबाच्या बेटावर, ३ वाजता अमोल ठाकूर लिखित व दिग्दर्शित म्हावरा गावलाय गो आणि ४.१५ वाजता पवन इंद्रेकर लिखित पुनम जावरे दिग्दर्शित मरी गई आदी नाटकांचे (Balnatya Spardha) सादरीकरण होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत