Nilambanachi Magni: जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा!

सामाजिक

भ्रष्टाचार विरोधी (Anti-corruption) जनआक्रोश संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांची (Nilambanachi Magni) मागणी

चोपडा (प्रतिनिधी) : जनतेच्या समस्या, प्रश्न, तक्रारींचे निवारण न करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी (Nilambanachi Magni) मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे (Maharashtra State Anti Corruption Public Agitation Organization) जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.

श्री. गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींची दखल न घेणारे तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या व नेत्यांच्या एका दूरध्वनीवर तात्काळ काम करून धन्यता मानणारे अधिकारी शासनाच्या अनेक शासकीय कार्यालयात दिसून येत आहेत. नागरिकांच्या मूलभूत समस्यांबद्दल अनास्था दाखविणाऱ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित (Nilambanachi Magni) केले तर अनेक तळागाळातील नागरिकांच्या समस्या सुटतील यात शंका नाही, असे नमूद करण्यात आले आहे. (Immediately suspend the officers who ignore public complaints!)

शासकीय कार्यालयातील अनेक विभागांमध्ये विशेषतः शासकीय खात्यात काही कामचुकार अधिकारी सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. या दुर्लक्षमागे अधिकारी व कंत्राटदार, दुकानदार उद्योगपती, विकासक यांच्याशी काही साटेलोटे तर नाही ना? अशी शंका नागरिकांच्या मनात आल्याशिवाय राहात नाही? समस्यांनी पीडित असलेल्या तक्रारदारांना अधिकारी वर्गाच्या कार्यालयात अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात. काही अधिकारी नागरिकांचे प्रश्न, समस्या, तक्रारीचे निवारण करीत नसल्याने शासन व प्रशासनाच्या प्रतिमेस गालबोट लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जनतेच्या समस्या प्रश्न, तक्रारींचे निवारण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करुन महाराष्ट्र शासनाचा तसेच प्रशासनाचा कारभार पारदर्शक आहे हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. शासन, प्रशासन हे सामान्य जनतेचेच आहे असा संदेश जनतेमध्ये जाईल. तरी दुर्लक्ष करीत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर प्रशासनाने व शासनाने निलंबनाची कारवाई करावी (Nilambanachi Magni) अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत