इच्छूकांची नावे सुचविण्यासाठी तालुकानिहाय बैठकांना सुरुवात; बुधवारी एरंडोल तालुका काँग्रेस (Congress) कमिटीच्या बैठकीचे आयोजन
मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) काँग्रेस (Congress) ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता काँग्रेस (Congress) ने महाराष्ट्र विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Maharashtra Congress) कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यात काँग्रेसकडून तालुकानिहाय बैठकांना सुरुवात करण्यात येणार आहे. बुधवार, दि.२६ रोजी एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीने या मोर्चे बांधणीला सुरुवात होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी (INDIA) तील शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ला ९, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार) ला ९ तर काँग्रेस (Congress) ला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आघाडीतील सर्वच घटक पक्षांचा आत्मविश्वास तर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये जोश व उत्साह वाढला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक देखील काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांकडून तयारीला वेग आला आहे. विधानसभा मतदार संघानिहाय राजकीय आढावा घेण्यासह इच्छूकांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात काँग्रेस (Congress) ने आतापासूनच बैठकांना सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार व जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या आदेशावरून बुधवार, दि. २६ रोजी दुपारी २ वाजता महात्मा फुले हायस्कुल येथे एरंडोल तालुका काँग्रेस (Erandol Congress) कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संदीप घोरपडे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांच्या नावावर चर्चा करण्यात येणार आहे. एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व सेल आणि फ्रंटलच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी केले आहे.