Z P School Ravanje

सजविलेल्या ट्रॅक्टरमधून निघाली विद्यार्थ्यांची मिरवणूक

शैक्षणिक

रडार लाईव्ह न्यूज : वार्ताहर

रवंजे बुद्रुक (ता. एरंडोल) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे (Z.P. School) तील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव शनिवार, दि. १५ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांची गावातून सजविलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. अनोख्या पद्धतीने करण्यात आलेल्या स्वागताने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. (A procession of students started from decorated tractors)

विद्यार्थ्यांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. यात शाळेत प्रथमच अर्थात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि सत्कार या उपक्रमाचा देखील समावेश होतो. दरम्यान, नुकत्याच राज्यातील शाळांना सुरुवात झाली असून ठिकठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्वागत केले जात आहे. शनिवार, दि. १५ रोजी रवंजे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे (Z.P. School) त देखील शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांची सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शाळेत गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रवंजे बुद्रुकचे सरपंच नामदेव आधार माळी, रवंजे खुर्द. च्या सरपंच सुरेखा चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण नन्नवरे यांसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत