स्वा. सै. ज.सु .खडके प्राथमिक विद्या मंदिर

खडके विद्या मंदिरात प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

शैक्षणिक

जळगाव : स्वा. सै. ज.सु .खडके प्राथमिक विद्या मंदिरात नवागतांचे स्वागत व क्रमिक पुस्तक वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ ली त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर कुमकुम तिलक करून व गुलाब पुष्प फुगे देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमासाठी शाळा समिती चेअरमन सिंधुताई कोल्हे, पियुष कोल्हे, संस्थेचे चिटणीस अवधूत पाटील उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी प्रास्ताविक करून शाळेच्या उपक्रमांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, अशी ग्वाही उपस्थितांना दिली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, या हेतूने इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ‘टन टन टन घंटी बजी स्कूल की’ व ‘शाळा आमची आहे किती छान’ ही गीते सादर केली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांकडून स्वच्छते विषयक प्रतिज्ञा वदवून घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन रीता पिंपरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत