MAMCJ admiiton start

एम.ए.एम.सी.जे च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

शैक्षणिक


जळगाव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ आणि ‘एम.ए.एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता)’ या कौशल्यआधारित व रोजगारभिमुख पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत  दि. 31 जुलै 2023 आहे.’डिप्लोमा इन जर्नालिझम’ हा बारावी नंतरचा एक वर्षीय अभ्यासक्रम असून प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावीत किमान 40 टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पदवी (ग्रॅज्युएशन) नंतर ‘एम.ए.एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता)’ हा दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम पूर्णत: रोजगारभिमुख असून यशस्वी विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे, रेडिओ, वृत्तवाहिन्या, ऑनलाईन पत्रकारिता, सोशल मिडिया, जाहिरात संस्था आदी ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी, संवाद तज्ज्ञ, सोशल मिडिया हँडलर म्हणून कार्य करण्याची देखील संधी उपलब्ध आहे.
प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर भेट देवून https:// nmujoa.digitaluniversity.ac या ऑनलाईन अॅडमिशन लिंकला क्लिक करून प्रवेशासंबंधी अर्ज करणे आवश्यक आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ आणि ‘एम.ए.एम.सी.जे.’ प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर (8407922404), डॉ.गोपी सोरडे (9834166072) अथवा प्रशाळेत कार्यालयीन वेळेत 0257-2257436, 2257438 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी केले आहे.

MAMCJ admiiton start

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत