बापरे… हॉस्पिटलमध्ये घुसला बिबट्या (Leopard)

महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील घटना; बिबट्या (Leopard) ला पकडण्यात यश

नंदुरबार : जिल्हयातील शहादा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बिबट्या (Leopard) घुसल्याची धक्कादायक घटना घडली. वनविभागाच्या पथकाने वेळीच धाव घेत बिबट्याला पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शहादा शहरात मध्यवर्ती भागात आदित्य हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये बिबट्याने प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत तात्काळ वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर पथकाने रुग्णालयात धाव घेत बिबट्याला (Leopard) पकडण्यासाठी पिंजरा लावला.

चार तासानंतर यश

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाने पिंजरा लावून त्याला हटकून पकडण्याचा प्रयत्न केला. तब्बल चार तासापर्यंत बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरूच होता. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात पथकाला यश आले.

हॉस्पिटलबाहेर नागरिकांची गर्दी

हॉस्पिलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती शहादा (नंदुरबार) शहरात पसरताच नागरिकांनी हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे पथकाला बिबट्याला पकडण्यात अडचणी निर्माण होत असल्याने वनविभाग आणि पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांना हॉस्पिटलपासून दूर केले. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून त्याला पिंजऱ्यात कैद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत