आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहू!

महाराष्ट्र राजकारण

महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना नागरिकांनी दिले आश्वासन

जळगाव । प्रतिनिधी

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी शहरातील लांडोरखोरी उद्यान येथे गुरुवारी सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधला.

भाजपा मंडळ क्रमांक ९ मध्ये नागरिकांशी आ. भोळे यांनी जळगाव शहरात प्रगती होण्याबाबत व समस्यांचे निरसन करण्याबाबत चर्चा केली. यावेळी नागरिकांनी आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहून महायुतीला मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. प्रसंगी आ. भोळे यांनी मतदार संघाशी संबंधित प्रश्नाची माहिती घेतली. विकासकामांसाठी पुन्हा एकदा संधी देऊन आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे भावनिक आवाहन भाजपा कार्यकर्त्यांनी केले. ग्रामस्थांना वंदन करून भेटी-गाठी घेत आ. भोळे यांनी जेष्ठांकडून शुभाशिर्वाद घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत