अध्यक्षपदी अमीत भाटीया तर उपाध्यक्षपदी अशोक भाटीया

सामाजिक

जळगाव :- जिल्ह्यातील भाटीया समाज बांधवांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येवून अध्यक्षपदी अमीत भाटीया तर उपाध्यक्षपदी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त अशोक भाटीया यांची निवड करण्यात आली.

ज्येष्ठ समाजसेविका छायाबेन भाटीया यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.16) पद्मावती मंगल कार्यालय येथे ही बैठक पार पडली. बैठकीत गेल्या 6 वर्षांपासून समाजाचे कार्य संतगतीने सुरू होते. मात्र, या काळात समाजाचे आधारस्तंभ लक्ष्मीदास भाटीया व अशोक भाटीया यांचे चिरंजीव रितेश भाटीया, महेंद्र भाटीया, समाजाचे अध्यक्ष किशोर भाटीया, देवेंद्र वेद यांचे निधन झाले, त्यामुळे कार्य थांबले होते. या काळात धरणगाव भाटीया समाज व पंचमंडळाने 2 ते 3 कार्यक्रम घडवून आणल्याचे सांगून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

24 रोजी बक्षीस समारंभ

बैठकीत रविवार दि. 24 रोजी बक्षीस समारंभ व स्नेहसंमेलन आयोजीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील 5 वर्षांकरिता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी अमीत भाटीया, उपाध्यक्षपदी अशोक भाटीया, सचिवपदी विजय भाटीया, महिला मंडळाच्या अध्यक्षपदी स्मिता वेद, उपाध्यक्षपदी उज्वला भाटीया, सचिवपदी मनीषा भाटीया तर युवक मंडळात सारंग भाटीया, जिग्नेश भाटीया, निनाद भाटीया तेजस भाटीया, हर्षल भाटीया आदींची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी येत्या 8 दिवसात जाहीर करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी देणगी

बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांकडून देणगी देण्यात आली. सन्मान व प्रशस्तीपत्र अशोक भाटिया यांनी मान्य केले. अमीत भाटीया 11, 000, विजय भाटीया यांनी 5000, चंद्रशेखर भाटीया यांनी 1000, रशेष भाटीया यांनी 2100, उपेंद्र भाटीया यांनी 2100, दिपक वेद यांनी 1100, दिनेश वेद यांनी 1100, मयुर भाटिया यांनी 500, स्मिता वेद यांनी 1100 रुपये देणगी दिली.

बैठकीप्रसंगी मिनेश दलाल, दिपक वेद, निलेश भाटीया, तेजस भाटीया, उपेंद्र भाटीया, शारदा भाटीया, वर्षा भाटीया, चंद्रशेखर भाटीया, प्रशांत भाटीया, ॲड. कैलास भाटीया, श्रेय भाटीया, ममता वेद, शची भाटीया व समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत