एम. टी.एस. परीक्षेत खडके विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश; गुणवंतांचा सत्कार

Blog

जळगाव : राज्यस्तरीय एम. टी.एस. स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. दरम्यान, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

भुसावळ येथील के. नारखेडे कॉम्प्युटर टेक्नोलॉजी संस्था व के‌. एन.सी.टी.आय.एम.टी.एस. तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्या मंदिरातील 38 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात शाळेचा निकाल 97.22% लागला. विद्यालयाचा विद्यार्थी सुशील किरण अत्तरदे ने 300 पैकी 256 गुण गुण मिळवून केंद्रातून प्रथम तर आदित्य हेमंत अहिराणे या विद्यार्थ्याने 300 पैकी 250 गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमाक पटकाविला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह शाळा समितीच्या अध्यक्षा गं.भा. सिंधुताई विजयराव कोल्हे, चिटणीस अवधूत पाटील, मुख्याध्यापक संजय पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक सुनील पवार, वंदना धुमाळ, लीलाधर किरंगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरस्वती वटाणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत