BJP

प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात

महाराष्ट्र राजकारण

जुन्या जळगावात नागरिकांकडून पुष्पवृष्टी, महिला भगिनींकडून औक्षण : जेष्ठाकडून घेतले शुभाशीर्वाद

प्रतिनिधी | जळगाव

जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार (Jalgaon BJP Candidate) आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराला मंगळवारी (दि. ५) ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला. प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. भोळे यांनी प्रचाराची सुरुवात केली. यानंतर जुने जळगाव परिसरातील विविध भागांमध्ये जाऊन प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी औक्षण करून तसेच पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळे (MLA Raju Mama Bhole) यांचे स्वागत करण्यात आले.

जुने जळगाव परिसरातील विविध कॉलनीमध्ये महिला भगिनींनी आ.राजूमामा भोळे (MLA Raju Mama Bhole) यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले. अनेक भागात ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. प्रचार रॅलीत ‘कहो दिल से, राजूमामा फिर से’, एक, दोन, तीन, चार… राजूमामाच होणार आमदार’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या. गोपाळपुरा परिसरातील भोलेनाथ मंदिरामध्ये आ. राजूमामा भोळे यांनी पूजन करून आशीर्वाद घेतले. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे शुभाशीर्वाद घेऊन आ. राजूमामा भोळे यांनी प्रचार रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी आघाडी घेतली.

रॅलीमध्ये आ. राजूमामा भोळे, खा. स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, विधानसभा प्रमुख विशाल त्रिपाठी, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी महापौर सीमा भोळे, शिवसेना शिंदे गटाचे महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी, माजी महापौर ललित कोल्हे, महानगर प्रमुख संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आरपीआय (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लल्लन सपकाळे, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, आनंदा सोनवणे,

ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव मेटकर, उद्योजक भागवत भंगाळे, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी उपमहापौर सुनील खडके, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, माजी नगरसेवक अजित राणे, मनोज काळे, डॉ.वीरेन खडके, डॉ. वैभव पाटील, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भारती सोनवणे, गायत्री राणे, सरिता नेरकर, जितेंद्र मराठे, भगत बालाणी, राजेंद्र घुगे पाटील, प्रवीण कोल्हे, मुकुंदा सोनवणे, अमित काळे, मनोज अहुजा, दीपमाला काळे, मनोज काळे, भरत कोळी, चंदन कोल्हे, बंटी खडके, राजू सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, संजय सोनवणे, जयेश भावसार, ललित चौधरी, आशिष सपकाळे, राहुल वाघ, चित्रा मालपाणी, दीप्ती चिरमाडे, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेश्याम कोगटा, पियुष कोल्हे, माजी नगरसेवक ज्योती चव्हाण, गणेश सोनवणे, कुंदन काळे, महिला आघाडीचे शोभा चौधरी, आरपीआयचे राजू मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत