रडार लाईव्ह न्युज । प्रतिनिधी
जळगावमार्गे छत्रपती संभाजीनगर (Jalgaon To Chatrapati Sambhaji Nagar Highway) किंवा छत्रपती संभाजीनगरमार्गे जळगाव ये-जा करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ (National Highway 753) वरील वाकोद गावातील वाघुर नदीवरील डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठया पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेली आहे, त्यामुळे हा पुल पुर्णपणे जिर्ण झालेला आहे. दरम्यान, हा पुल वाहतुकीकरिता धोकादायक झालेला असल्याने या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवीत हानी होण्याची शक्यता असल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव (Jalgaon To Chatrapati Sambhaji Nagar Highway) या राष्ट्रीय महामार्गावरील क्र. ७५३ एफच्या डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठया पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेली असून हा पुल हा पुर्णपणे जिर्ण झालेला आहे. त्यामुळे हा पुल वाहतुकीकरिता धोकादायक झालेला आहे. या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवीत हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाची वाहतुक पुर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या पत्रान्वये काढण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार, जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव (Jalgaon To Chatrapati Sambhaji Nagar Highway) या मार्गावरील डाव्या बाजुने असलेला जुना मोठा पुल हा रविवार, दि. १६ जून २०२४ पासून पुलाची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागणार आहे.
मार्गात बदल
वाघुर नदीवरील पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर नागरिक तसेच वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. अवजड वाहतुक नेरीमार्गे एरंडोल, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर तर हलकी वाहतुक फर्दापुरमार्गे तोंडापुर, मांडवा, वाकडी, शहापुर, जामनेर, नेरी अशी वळविण्यात आली आहे. वाहतुक मार्गात असा बदल करण्यात मंजूरी दिली असल्याचे कार्यकरी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जालना यांनी कळविले आहे.