Extension of Crop Insurance Scheme

Crop Insurance : शेतकऱ्यांनो या योजनेला मिळाली आहे मुदतवाढ

कृषी

आजच घ्या लाभ ; ३ ऑगस्टपर्यंत मिळाली आहे मुदतवाढ

मुंबई :- एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) योजनेचा लाभ न घेता येऊ शकलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेला (PMFBY) शेतकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद व काही ठिकाणी आलेल्या अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून या योजनेला ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे लाभ घेऊ न शकलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रधानमंत्री पीक विमा योजनेला (PMFBY) मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत केंद्र सरकारने पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, या दृष्टीने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

तुम्ही हे देखील वाचू शकता.
Crop Insurance: जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीक विमा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत