Jalgaon Chatrapati Sambhaji Nagar Highway

महत्वाची बातमी : फर्दापूर ते जळगाव महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु

प्रशासकीय शासकीय

अवजड आणि हलक्या वाहनासाठी असे आहेत पर्यायी मार्ग; वाचा सविस्तर बातमी

रडार लाईव्ह न्यूज । जळगाव

जळगावमार्गे छत्रपती संभाजीनगर ये-जा करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. फर्दापूर ते जळगाव महामार्गाच्या (Fardapur to Jalgaon highway) चौपदरीकरणाचे काम (four-lane work) हाती घेण्यात आल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. अवजड आणि हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग देण्यात आले असून यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत होणार आहे. (Important news: Fardapur to Jalgaon highway four-lane work has started)

जामनेर तालुक्यातील वाकोद गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ (एफ) (National Highway 753 F) वरील डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठया पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेली आहे. हा पुल पुर्णपणे जिर्ण झालेला असल्याने हा पुल वाहतुकीकरिता धोकादायक झालेला आहे. दरम्यान, या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवीत हाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने जळगाव ते छत्रपती संभाजीनगर (Jalgaon To Chatrapati Sambhaji Nagar Highway) या महामार्गावरून होणारी वाहतुक पुर्णपणे बंद केली आहे.

पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या पत्रान्वये काढण्यात आलेल्य अधिसुचनेनुसार जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव (Chatrapati Sambhaji Nagar To Jalgaon Highway) या मार्गावरील डाव्या बाजुने असलेला जुना मोठा पुल हा रविवार, १६ जून, २०२४ पासून पुलाची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आला आहे.

अवजड वाहनांसाठी असा आहे पर्यायी मार्ग
वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून अवजड आणि हलक्या वाहनासाठी स्वतंत्र पर्यायी मार्गांनी वाहतूक वळविण्यात आली आहे. जड वाहतुकीसाठी (दुहेरी वाहतुक मार्ग) नेरी, एरंडोल, चाळीसगाव, नांदगाव, शीरुर बंगलामार्गे छत्रपती संभाजीनगर तसेच जळगाव (अजिंठा चौफुली), मुक्ताईनगर, मलकापुर, बुलढाणा, जालनामार्गे छत्रपती संभाजीनगर अशी वाहतूक वळविण्यात आली आहे.

हलक्या वाहनांसाठी असा आहे पर्यायी मार्ग
हलक्या वाहनांसाठी (एकेरी वाहतुक मार्ग) जळगाव ते छत्रपती संभाजीनगरसाठी जळगाव, पहुर, वाकोद, फर्दापुरमार्गे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर ते जळगावसाठी छत्रपती संभाजीनगर, फर्दापुर, फर्दापुर तांडा (सोयगाव रोड), वरखेडी तांडा फाटा, वाकोदमार्गे पहुर असा बदल करण्यात आला आहे. या पर्यायी मार्गांना प्रश्नासकडून मंजूरी दिली आहे, असे जालना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकरी अभियंता यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत