जळगाव : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री (Sports Minister) म्हणून खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांची नियुक्ती झाल्याने जळगाव शहरातील विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी व खेळाडूतर्फे मंगळवार, दि. ११ रोजी जल्लोष करण्यात आला.
जळगावातील व्हॉलीबॉल, बास्केटबॉलच्या क्रीडांगणावर व्हॉलीबॉलचे अध्यक्ष तथा हॉकी, फुटबॉल, स्विमिंग, पॅरा ओलंपिक संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या नेतृत्वात हा जल्लोष करण्यात आला. जल्लोष करण्यासाठी क्रिकेट संघटनेचे तथा व्यापारी संघटनेचे युसुफ मकरा यांनी फटाके उपलब्ध करून दिले. अब्दुल ट्रान्सपोर्टचे अनवर खान यांच्यातर्फे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. अनिता कोल्हे, बास्केटबॉलचे आंतरराष्ट्रीय पंच वाल्मीक पाटील, सेंट लॉरेन्सच्या क्रीडा शिक्षिका हिमाली बोरोले, हॉकी जळगावचे तथा पारोळ्याचे क्रीडाशिक्षक सत्यनारायण पवार, मिल्लत हायस्कूलचे क्रीडा शिक्षक राहील अहमद, पोलीस बॉईज क्लबचे वसीम शेख, राष्ट्रीय खेळाडू कृपा बाविस्कर, प्रतीक्षा सोनवणे, पूर्वा हटकर यांसह व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॉकी, फुटबॉल वॉलीबॉलचे खेळाडू उपस्थित होते.