सोन्याचे दर पोहोचले

सोन्याचे दर पोहोचले ‘इतक्या’ हजारांवर

सोन्याचे दर

सोन्याचे दर पोहोचले ‘इतक्या’ हजारांवर
चांदीनेही गाठली सत्तरी ; वाचा सविस्तर बातमी

सोन्याचे दर पोहोचले

जळगाव :- लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे या काळात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोणताही सण उत्सव किंवा लग्नसराई नसतांनाही सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे.

राजा-महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत सोने आणि चांदीच्या दागिने नेहमी आकर्षण राहिले आहे. त्यामुळे तेच परिधान करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सण, उत्सव असो की, घरातील कार्यक्रम नागरिकांकडून आजही सोने आणि चांदीच्या दागिन्यांची हमखास खरेदी केली जाते. मागील काही वर्षांपासून तर चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

चांदीने गाठली सत्तरी
सोन्या इतकीच मागणी चांदीला देखील आहे. त्यामुळे मागील पाच दिवसात चांदीच्या दरात तब्बल 1,210 रुपयांनी वाढ होवून चांदीने 70 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. 29 जून रोजी चांदीचे दर 69,310 रुपये प्रती किलो होते. त्यानंतर 30 जून रोजी त्यात 600 रुपयांनी, 2 जुलै रोजी 10 रुपयांनी, 3 रोजी 80 रुपयांनी, 4 रोजी 250 रुपयांनी तर 5 रोजी 80 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर प्रती किलो 70 हजार 520 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याचे दरात इतकी वाढ
मागील पाच दिवसात सोन्याच्या दरात 410 रुपयांनी वाढ झाली आहे. 29 जून रोजी सोन्याचे दर प्रती तोळा (10 ग्रॅम) 58,140 रुपये होते. त्यात 30 जून रोजी 120 रुपयांनी, 2 जुलै रोजी 10 रुपयांनी, 3 रोजी 80 रुपयांनी, 4 रोजी 170 रुपयांनी तर 5 रोजी 30 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर प्रती तोळा 58 हजार 550 रुपयांवर पोहोचले आहेत.

2 thoughts on “सोन्याचे दर पोहोचले ‘इतक्या’ हजारांवर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत