परिषदेचे मुख्य संयोजक प्रा. भरत शिरसाठ यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी । जळगाव
संविधानाला 75 वर्षेे पूर्ण झाली असून ते सर्वमान्यांपयर्र्ंत पोहोचावे, त्यांचे हक्क, कर्तव्य त्यांच्यापयर्र्ंत पोहोचावेत यासाठी रविवार, दि.16 रोजी एरंडोल येथील हॉटेल कृष्णा मैदानावर खान्देशातील पहिले राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करणण्यात आले आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील डॉ.अनंत राऊत राहणार असून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याहस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक प्रा. भरत शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वागताध्यक्ष शालीग्राम गायकवाड, भंते अमरज्योती, साहित्यीक जयसिंग वाघ, कोअर कमिटी सदस्य धनराज मोतीराय, डॉ. संदिप कोतकर, डॉ. नरेेंद्र तायडे, रणजीत सोनवणे, हेमेेंद्र सपकाळे, प्रा. उमेश सुर्यवंशी, भारती ठाकरे, भैय्यासाहेब सोनवणे, चिंतामण वाघ आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना शिरसाठ म्हणाले की, परिषदेच्या उद्घाटनापूर्वी सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर 9 वाजता परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी संविधान चळवळीमध्ये लढा देणार्या मान्यवरांचा ‘संविधान लढा चेतना’ पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच संविधानावर लेखन करणार्या लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे. यात प्रा. भरत शिरसाठ, वर्षा शिरसाठ, डॉ. राहूल निकम आदींच्या पुस्तकांचा समावेश आहे. संविधान निर्माण चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात येणार आहे. परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
परिषदेच्या पहिल्या सत्रात धर्माधिष्ठित संविधान निर्मितीचा प्रयत्न हा भारताच्या सार्वभौमत्वाला व अखंडतेला एका मोठा धोका आहे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अॅड. संघराज रुपवते राहणार असून वक्ते म्हणून साहित्यीक जयसिंग वाघ, वंचित बहुजन आघाडीच्या शमीभा पाटील उपस्थित राहणार आहेत. दुसर्या सत्रात भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित झाली आहे काय? या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे राहणार असून वक्ते म्हणून संविधान अभ्यासक नुरखॉ पठाण, प्रा. डॉ. राहूल निकम उपस्थित राहणार आहेत. तिसर्या सत्रात भारतीय संविधानाला अपेक्षित स्त्री-पुरुष समानता आणि देशातील स्त्री व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न : एक गंभीर चिंतन या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत किरण सोनवणे हे राहणार असून वक्ते म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या डॉ. सरोज डांगे, धनदाई महाविद्यालयाचे डॉ. लिलाधर पाटील उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.